नोव्हेंबर २०२६
संस्था पदाधिकाऱ्यांशी संवादसभा
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची संवाद व सहविचार सभा; यावेळी प्रा. डॉ. विशाल पतंगे यांना उपप्राचार्यपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
नांदेड: नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथे संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद व सहविचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील हे होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्लजी अग्रवाल, सचिव सौ. श्यामल दीपनाथ पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. दत्ता भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे उपस्थित होते. प्रथम प्राचार्यांनी बैठक आयोजनाचे प्रास्ताविक केले. नंतर कार्यकारिणी सदस्य तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. यशपाल भिंगे, प्रा. विलास वडजे, प्रा. रोडे, प्रा. कल्पना जाधव, प्रा. विजय कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या शैक्षणिक धोरणांबाबत, महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत तसेच विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापकांनीही विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर आपली मते मांडत संस्थेच्या प्रगतीसाठी उपयुक्त सूचना केल्या. संवादात्मक वातावरणात पार पडलेल्या या सहविचार कार्यक्रमामुळे संस्था व महाविद्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला.
याच प्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विशाल पतंगे यांची शैक्षणिक उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संस्थेच्या सचिव सौ. श्यामल दीपनाथ पत्की यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांनी प्रा. डॉ. विशाल पतंगे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या बैठकीचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. संदीप गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
छायाचित्र संग्रह
संस्था पदाधिकाऱ्यांशी संवादसभा
पीपल्स कॉलेजमधील या कार्यक्रमाची छायाचित्रे.
प्रवेश
तुमच्या आयुष्यतील उच्चशिक्षणाची सुरुवात आजच करा.
पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.