नांदेड एज्युकेशन सोसायटी

२१–२४ जुलै २०२६

चार दिवसीय उद्बोधन कार्यक्रम

बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय उद्बोधन कार्यक्रम; नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन.

स्वकष्टातून स्वतःची ओळख निर्माण करता येते. कठीण परिश्रमातून निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते; त्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करीत ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी केले. ते पीपल्स कॉलेज, नांदेड आयोजित बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच्या चार दिवसीय 'उद्बोधन कार्यक्रमात' उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, तर उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. एन. मोरे यांची मंचावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामध्ये टिकण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता आहे. विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहेत. वाचन चळवळ समृद्ध होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला मित्र बनविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी महाविद्यालयात चालत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती देवून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उद्बोधन कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेविषयी लेफ्टनंट डॉ. मुकूंद कवडे, ग्रंथालयाविषयी ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी प्रा. कल्पना जाधव यांनी माहिती दिली. कार्यक्रमात वर्षभर विविध ग्रंथ वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांतून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील व ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड यांच्यावतीने 'उत्कृष्ट वाचक' पुरस्कार तसेच डॉ. डी. एन. मोरे यांच्यावतीने 'उत्कृष्ट समीक्षक' पुरस्कार देण्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना जाधव, प्रास्ताविक डॉ. डी. एन. मोरे तर आभार प्रा. संदीप गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. बाजीराव वडवळे, डॉ. भगवान जाधव, डॉ. अमोल काळे, प्रा. स्वाती काटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र संग्रह

चार दिवसीय उद्बोधन कार्यक्रम

पीपल्स कॉलेजमधील या कार्यक्रमाची छायाचित्रे.

प्रवेश

तुमच्या आयुष्यतील उच्चशिक्षणाची सुरुवात आजच करा.

पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.