२५ जुलै २०२६
उद्बोधन कार्यक्रमाचा समारोप
चार दिवसीय उद्बोधन कार्यक्रमाचा समारोप; नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा. शामल पत्की यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महाविद्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे कारण यशाचा मार्ग महाविद्यालयातून जातो. महाविद्यालय हे सुसंस्कृत नागरिक घडवणारे केंद्र झाले पाहिजे, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्रा. शामल पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. त्या पीपल्स कॉलेज, नांदेड आयोजित बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर नांदेड एज्युकेशन सोसायटी सहसचिव कॉ. प्रदीप नागपूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. एन. मोरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य गोविंदभाई श्राफ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप नागापूरकर यांनीही पीपल्स कॉलेजच्या परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली आणि भावी शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना जाधव, प्रास्ताविक डॉ. डी. एन. मोरे तर आभार प्राचार्य विकास सुकाळे यांनी मानले. या कार्यक्रमात डॉ. बाजीराव वडवळे, डॉ. अमोल काळे, डॉ. भगवान जाधव, डॉ. रेश्मा डोईफोडे, प्रा. स्वाती काटे, प्रा. संदीप गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्बोधन कार्यक्रमाचा समारोप २५ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
छायाचित्र संग्रह
उद्बोधन कार्यक्रमाचा समारोप
पीपल्स कॉलेजमधील या कार्यक्रमाची छायाचित्रे.
प्रवेश
तुमच्या आयुष्यतील उच्चशिक्षणाची सुरुवात आजच करा.
पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.