नांदेड एज्युकेशन सोसायटी

६ जुलै २०२६

आमदार अमर राजूरकर यांचा सत्कार

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विधानसभा सदस्य मा. आ. अमरराजू राजूरकर यांचा नरहर कुरुंदकर सभागृहात सत्कार.

पीपल्स कॉलेज, नांदेडचे माजी विद्यार्थी आणि विधानसभा सदस्य मा. आ. अमरराजू राजूरकर यांचे महाविद्यालयास भेट व सत्कार समारंभ सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी नरहर कुरुंदकर सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल अग्रवाल, सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. दत्ता भगत, प्राचार्य डॉ. विकास सुकाळे उपस्थित होते.

सत्कार समारंभात आ. राजूरकर यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी आणि महाविद्यालयाच्या परंपरेविषयी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येयनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप गायकवाड यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

छायाचित्र संग्रह

आमदार अमर राजूरकर यांचा सत्कार

पीपल्स कॉलेजमधील या कार्यक्रमाची छायाचित्रे.

प्रवेश

तुमच्या आयुष्यतील उच्चशिक्षणाची सुरुवात आजच करा.

पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.